पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा; पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन होणार
सिरोंचा : सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेची मासिक बैठक गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सिरोंचा येथील शासकीय विश्रामगृहात (गेस्ट हाऊस) आयोजित करण्यात आली आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडणार आहे.या बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्या तसेच नवीन पत्रकार बांधवांना संघटनेत प्रवेश व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, आगामी पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे नियोजन केले जाणार आहे. तसेच पत्रकार संघटनेच्या आगामी उपक्रमांबाबतही विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.पत्रकारांच्या एकजुटीला बळकटी देणे, पत्रकारांच्या समस्या मांडणे आणि पत्रकार दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व आहे.तरी सिरोंचा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी या मासिक बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.










